CoronaVirus : हिंगोलीत आणखी एक एसआरपी जवान पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:12 PM2020-04-27T21:12:55+5:302020-04-27T21:13:40+5:30
येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवानांना कोविड-१९ ची लागण झाली आहे.
हिंगोली : येथील राज्य राखीव दलातील आणखी एका जवानाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून जालना येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे हिंगोलीकरांना आता शासनाच्या नियमांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रूग्णसंख्या १३ वर पोहचली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव दलातील ५ जवानांचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आले. येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवानांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. यातील २ जवान हे मुंबई येथे तर १० जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. तर १ व्यक्ती जालना येथून आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीतांची रुसंख्या ही १३ झाली आहे.
जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील कोरोना (कोविड-19) ची लागण झालेला जवान हिंगोली येथील राहत असलेल्या गावातील परिसरात व त्याच्या संपर्कात आलेल्या ९५ व्यक्तींना आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आहे. या सर्वांचा थ्रोट स्वॅब अहवाल तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्यापैकी २८ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यापैकी २७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरीत अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवान तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला १ व्यक्ती असे एकूण १३ रुग्णांना येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आहे.