Coronavirus : हिंगोलीकरांसाठी आनंदवार्ता ; दोन कोरोनामुक्त जवानांना रुग्णालयातून मिळणार सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 07:52 PM2020-05-08T19:52:40+5:302020-05-08T19:53:10+5:30
आतापर्यंतच्या ९१ पैकी ३ कोरोनामुक्त झाल्याने ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली : जिल्हा रुग्णालयात दाखल दोन जवानांचा १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने हे दोन जवान कोरोनामुक्त झाल्याची सुखद वार्ता आज समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या ९१ पैकी ३ कोरोनामुक्त झाल्याने ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली येथील एसआरपीएफचे आता ८१ जवान बाधित उरले आहेत. तर एक जालन्याचा असून त्याच्या संपर्कातील हिवरा बेलचे दोन, जांभरुण रोडगेचे दोघे, वसमत व हिंगोली येथील प्रत्येकी एक जण उपचार घेत आहे. हिंगोलीचे पाच जवान खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद येथे हलविले आहेत. जे दोन जवान कोरोनामुक्त झाले, त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे.
हिंगोली येथे आतापर्यंत १३५३ संशयित दाखल झाले. यापैकी १२२९ निगेटिव्ह आले आहेत. तर १0८१ जणांना घरी सोडले आहे. तर २७ जणांचे थ्रोट स्वॅब प्रलंबित आहेत. आता दोन क्वारंटाईन रिकामे असून पाच क्वारंटाईनमध्ये २६३ जण भरती आहेत.