coronavirus : हिंगोली @ १५१; दिवसभरात ५० बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:13 AM2020-05-24T00:13:02+5:302020-05-24T00:14:24+5:30

सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे

coronavirus: Hingoli @ 151; Over 50 corona infected patients today | coronavirus : हिंगोली @ १५१; दिवसभरात ५० बाधित रुग्णांची भर

coronavirus : हिंगोली @ १५१; दिवसभरात ५० बाधित रुग्णांची भर

Next

हिंगोली : जिल्ह्यात आधी एसआरपीएफच्या जवानांमुळे एकदाच मोठी रुग्णसंख्या वाढली होती. त्यानंतर अशी एकदाच रुग्णवाढ होईल, असे वाटत नसतानाच आज एकाच दिवशी तब्बल ५० जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आता एकूण रुग्णसंख्या १५१ वर गेली असून बरे झालेल्यांची संख्या ८९ आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे.

हिंगोलीत शनिवारी सकाळीच ६ जण कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे यापूर्वीच्या १0१ वरून आकडा १0७ वर पोहोचला होता. नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये यापूर्वी हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिघे होते. तर वसमत येथील दोघे नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीचे दोनजण बरे झाल्यानंतर आता पुन्हा एकदाच दोन जण आढळल्याचे दिसून येत आहे. वसमत तालुक्यातील वापटी येथील सात जणही आधीच उपचार घेत आहेत. याशिवाय औंढा तालुक्यातील देवाळा येथील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व मुंबई रिटर्न आहेत. तर सर्वच जण आधीच क्वारंटाईन केले होते. तरीही काहींनी गावात जावून परत रुग्णालय गाठलेले असल्याने प्रवासी हिस्ट्री तपासण्यात येत आहे. 

सायंकाळी पुन्हा एकदा काही जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल आले. यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णसंख्या १२0 वर पोहोचली आहे. या तालुक्यात आधी फक्त जांभरुण रोडगे येथे दोघे आढळले होते. ते बरे होवून घरी सोडले आहेत. आता नव्याने मुंबईहून परतलेले खुडज येथील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बरडा येथे दिल्लीहून परतलेले ३ जण पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय गोरेगाव येथील क्वारंटाईनमधील सुरजखेडा येथील एकजणही पॉझिटिव्ह आढळला आहे. तोही मुंबईहून परतलेलाच असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास  हिंगोली येथील  लिंबाळा  विलगीकरण कक्षात  असलेल्या  31 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये  मुंबईहून  परतलेले  22, औरंगाबाद येथून परतलेले  चार, रायगड येथून परतलेला एक, कर्नाटकातील बिदरहून  आलेला एक, तर भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील  दोघांसह एका  डॉक्टरलासुद्धा  कोरोनाची बाधा झाली आहे.

कळमनुरीत निरंक
आता हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये किमान एक तरी रुग्ण आढळलेला आहे. मात्र कळमनुरी हा एकमेव तालुका आहे, जेथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात सर्वाधिक १0 हजार ३४७ जण परजिल्ह्यातून परतलेले आहेत. मुळात स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असलेला हा तालुका आहे. त्यामुळे ही कोरोनामुक्तीची परिस्थिती कायम राहण्यासाठी या तालुक्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

Web Title: coronavirus: Hingoli @ 151; Over 50 corona infected patients today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.