CoronaVirus In Hingoli : हिंगोलीत रविवारपर्यंत सर्व दुकाने बंद; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 01:15 PM2020-04-03T13:15:49+5:302020-04-03T13:16:18+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

CoronaVirus In Hingoli: All shops closed until Sunday in Hingoli; Caution due to corona patient being found | CoronaVirus In Hingoli : हिंगोलीत रविवारपर्यंत सर्व दुकाने बंद; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

CoronaVirus In Hingoli : हिंगोलीत रविवारपर्यंत सर्व दुकाने बंद; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

Next

हिंगोली : हिंगोलीत कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळुन आल्याने खबदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी औषधी सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३ ते ५ एप्रिल दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश गुरूवारी काढले आहेत. 

कोरोनाचा हिंगोली जिल्ह्यातही शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यापूर्वी किराणा दुकान व भाजीपाला खरेदीसाठी एक दिवस आड मुभा देण्यात आली होती. परंतु आता पुढील तीन दिवस ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान औषध दुकाने वगळता किराणा दुकान व भाजीपाला यासहसर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी या सर्वच वाहनांना रस्त्यावरून फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या बाबातचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर जिल्हा प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याशिवाय वैद्यकीय आपातकाल असल्यास आरोग्य विभागाची अ‍ॅम्ब्युलन्स टोल फ्री १0८, १0२ वर संपर्क करावा किंवा इतर आपातकालीन परिस्थितीमध्ये खाजगी वाहनाने प्रवास करायचा असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष यांचा टोल फ्री क्रमांक १00 वर संपर्क साधावा. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर २४ तास स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षावर संपर्क करून पूर्वपरवानगीनेच प्रवास करता येईल.
संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. यात जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय 0२४५६-२२२५६0, तालुका नियंत्रण कक्ष तहसील हिंगोली 0२४५६-२२२५११, सेनगाव-९८३४९७५२८९, कळमनुरी- 0२४५५-२२00२१, वसमत-९५६११३४३0९, औंढा-९0२८१७४४४३ या क्रमांकांचा वापर करायचा आहे.

सावधान...! वसमतमध्ये सिमाबंदी
वसमत शहर व परिसरात सर्व प्रकारच्या हालचाली व्यक्ती, वाहन यास बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढला आहे. त्याचबरोबर वसमत शहराच्या संपूर्ण सीमा बंद करण्याचा आदेश दिला असून यातून कोणतीही वाहने अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहे.यात परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्ते, बाजार, गल्ली, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास शिक्षेस पात्र ठरणार आहे.

Web Title: CoronaVirus In Hingoli: All shops closed until Sunday in Hingoli; Caution due to corona patient being found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.