CoronaVirus : हिंगोलीला हादरा ! एसआरपीचे तब्बल २५ जवान पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 09:58 AM2020-05-01T09:58:54+5:302020-05-01T10:00:29+5:30
यातील 20 जवान कोरंटाईन सेंटरमध्ये असून पाच जण आयसोलेशन वार्डात भरती केले आहेत. या सर्व जवानांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आले होते.
हिंगोली: येथील एसआरपीएफचे तब्बल 25 जवान नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एसआरपीच्या एकूण 41 जवानांना आतापर्यंत लागण झाली असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 47 वर पोहोचली आहे.
एसआरपीएफच्या पंचवीस जवानांचे अहवाल आज सकाळी नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 20 जवान कोरंटाईन सेंटरमध्ये असून पाच जण आयसोलेशन वार्डात भरती केले आहेत. या सर्व जवानांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आले होते. एसआरपीच्या एकूण 41 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी तेहतीस जवान मालेगाव येथे तर आठ जवान मुंबई येथे कार्यरत होते. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील एका युवकाचा नांदेड येथे पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. हा युवक पंजाब येथे खाजगी ट्रॅव्हल्सने भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. 28 एप्रिलला तो नांदेडला परतल्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालयात कोरंटाईन केले होते. आज सकाळी त्याचाही अहवाल पॉझिटिव आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 47 रुग्ण दाखल झाले असून त्यातील एक जण बरा होऊन घरी पोहोचला. सध्या हिंगोली येथे 45 जण उपचाराखाली आहेत. एका जवानास औरंगाबादला हलविले असून नांदेड येथे पॉझिटिव्ह आढळलेला बाळापूर येथील युवक नांदेडलाच उपचार घेत आहे.