CoronaVirus : कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:21 PM2020-04-06T17:21:02+5:302020-04-06T17:22:13+5:30
दोघांचे अहवाल प्रलंबित
हिंगोली : जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गिताच्या संपर्कातील एक व त्या शहरातून आलेला एक अशा दोघांचेही थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आणखी नवीन दोघे दाखल झालेले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णाचीही प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आढळलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र अशा ९ जणांनाही अजून वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवले आहे. या सर्वांना कदाचित पुढील काळात लक्षणे आढळून आल्यास इतरांना संसर्ग होवू नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोघांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल व आज पुन्हा वसमतमधील दोघांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकजण कोरोना संसर्गिताच्या संपर्कातील आहे. या दोघांचेही थ्रोट स्वॅब नमुने औरंगाबाद प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.
हिंगोली जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २२ जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. यापैकी एकजण बाधित आढळला. तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.