CoronaVirus : धक्कादायक ! हिंगोली जिल्ह्यात पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:41 AM2020-04-28T10:41:29+5:302020-04-28T11:01:44+5:30

कोरोना लागण झालेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने लागण

CoronaVirus: Shocking! Five-year-old child infected with corona in Hingoli district; total 14 patients | CoronaVirus : धक्कादायक ! हिंगोली जिल्ह्यात पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १४ वर

CoronaVirus : धक्कादायक ! हिंगोली जिल्ह्यात पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १४ वर

googlenewsNext
ठळक मुद्देसेनगाव येथील आयसोलेशन सेंटरमध्ये उपचारासाठी सुरू

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. काल 27 एप्रिल रोजी एकाच दिवसात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता त्यापाठोपाठ सेनगाव येथील कोरंटाइन सेंटरमध्ये असलेल्या एका पाच वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

28 एप्रिल रोजी या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोलीत एसआरपीएफ हिंगोलीचे 11 जवान तर जालना 1, एकूण बारा जवानांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जालना येथील एका जवानाच्या संपर्कातील व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली.

वरील एकूण 13 रुग्ण हे आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असून आज एका पाच वर्षीय बालकाचा अहवालही पॉझीटीव्ह आल्याने आता एकूण रुग्ण संख्या 14 झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली.

Web Title: CoronaVirus: Shocking! Five-year-old child infected with corona in Hingoli district; total 14 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.