coronavirus : कोरोनापासून खबरदारी; औंढा येथील नागनाथांचे मंदिर ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:57 PM2020-03-17T13:57:44+5:302020-03-17T13:58:18+5:30

या दरम्यान केवळ पुजाऱ्यांना नित्य पूजा करण्यास परवानगी

coronavirus: The temple of Nagnath at Aundha closed for devotees till 31st March due to corona | coronavirus : कोरोनापासून खबरदारी; औंढा येथील नागनाथांचे मंदिर ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद

coronavirus : कोरोनापासून खबरदारी; औंढा येथील नागनाथांचे मंदिर ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद

googlenewsNext

औंढा नागनाथ:  आठवे जोतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद करण्याचा आदेश तहसीलदार तथा मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग माचेवाड यांनी दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

संपूर्ण देशामध्ये कोरंना व्हायरसने हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे गर्दी कमी करण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत येथील मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय संस्थांनचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांनी घेतला आहे. दरम्यान, मंदिरातील पहाटे साडेपाच चे स्नान, दुपारी बारा वाजता असणारा महानैवेद्य आरती, दुपारी चार वाजता महादेवाला स्नान व रात्री आठच्या नंतर ची आरती अशा धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र यावेळी केवळ पुजारीच उपस्थित असतील. 

Web Title: coronavirus: The temple of Nagnath at Aundha closed for devotees till 31st March due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.