कापसाची ऑनलाईन पद्धतीने होणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:16+5:302020-12-31T04:29:16+5:30
शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाईन नाेंदणी करण्याचे आवाहन कृउबासतर्फे करण्यात आले आहे. नंतरच कापूस विक्रीसाठी आणावा. सध्या सीसीआयची कापूस ...
शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाईन नाेंदणी करण्याचे आवाहन कृउबासतर्फे करण्यात आले आहे. नंतरच कापूस विक्रीसाठी आणावा. सध्या सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. यामध्ये आता एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी केला केला जाणार आहे. यामध्ये एकरी १२ क्विंटल कापूस खरेदी केला जाईल. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून स्वतः हजर राहवे. एका शेतकऱ्यांकडील चाळीस क्विंटल कापूस खरेदी केला जाणार आहे. तसेच बैलगाडीने कापूस विक्रीसाठी आणताना सुद्धा बाजार समितीकडे ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन सभापती अंकुश आहेर, सचिव रमेश चोखट यांनी केले आहे.
९० हजार क्विंटल कापूसाची खरेदी
जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सीसीआयची कापूस खरेदी सूरू आहे. जवळा बाजार व शिरडशहापूर या दोन केंद्रावर कापूस खरेदी १९ नोव्हेंबरपासून सूरू आहे. आतापर्यंत जवळपास ९० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.