सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची २० टेबलांवर होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:29+5:302021-01-18T04:27:29+5:30

सेनगाव तालुक्यातील ८१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी झाले, तर २० टेबलांवर मतमाेजणी होणार आहे. ७९९ ...

Counting of votes will be done on 20 tables of Gram Panchayat elections in Sengaon taluka | सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची २० टेबलांवर होणार मतमोजणी

सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची २० टेबलांवर होणार मतमोजणी

googlenewsNext

सेनगाव तालुक्यातील ८१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी झाले, तर २० टेबलांवर मतमाेजणी होणार आहे. ७९९ जागेंसाठी १५८३ उमेदवारांनी आपले राजकीय भवितव्य आजमावले आहे. तालुक्यात ८१.६४ टक्के मतदान झाले. तालुक्यातील २४७ मतदान केंद्रावरील ३१७ बूथवर मतदान घेण्यात आले. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. ग्रामपंचायत निवडणूक निकालकामी २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक मतमोजणी २० टेबलांवर होणार असल्याने मतमोजणीची प्रक्रिया १२ ते १५ फेरीत पूर्ण होत असल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी तालुका निवडणूक निर्वाचन अधिकारी जीवककुमार कांबळे, मुख्‍याधिकारी शैलेश फडसे, नायब तहसीलदार निवडणूक वीरकुवर, अशोक भोजने, गटविकास अधिकारी बेले, सहायक गटविकास अधिकारी कोकाटे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव, अभयकुमार माकणे, कार्यालयीन अधीक्षक जाधव, मनोज लोखंडे, अवल कारकून, निवडणूक बळीराम राठोड अव्वल कारकून विनोद अंभोरे, जाधव, कारघोडे, विजय राठोड, गाढवे, पुरुषोत्तम पुरी यांसह इतर कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

ग्रामपंचायत मतदान निकाला दरम्यान स्वतः उमेदवार व त्यांचा एक प्रतिनिधी यांना मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रावर ओळखपत्र आधारे प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती तालुका निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी दिली.

Web Title: Counting of votes will be done on 20 tables of Gram Panchayat elections in Sengaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.