मतमोजणी ऐकायला जावे लागणार शहराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:55 AM2019-05-23T00:55:26+5:302019-05-23T00:55:49+5:30
तालुक्यातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली. मात्र हिंगोली शहरवासियांना निकाल ऐकण्यासाठी मात्र शहराबाहेर जावे लागणार आहे.
हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली. मात्र हिंगोली शहरवासियांना निकाल ऐकण्यासाठी मात्र शहराबाहेर जावे लागणार आहे.
हिंगोली - औंढा नागनाथ या मुख्य मार्गावरील शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयात २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे सकापासूनच या ठिकाणी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी होणार आहे.
हिंगोली शहरातील नागरिकांना मात्र शहराबाहेर निकाल ऐकायला यावे लागणार आहे. मुख्य रस्ता असल्याने येथून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून नियोजन करण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घेत ठिक -ठिकाणी ट्रॅफिकचे गेट उभे केले जाणार आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी यावेळी तैनात असणार आहेत.
झाडांची सावलीही नाही सध्या तामपानात वाढ होत असल्याने ऐन मतमोजणीच्या दिवशी भर उन्हात निकाल ऐकावा लागणार आहे.
परिसरात झाडेही नाहीत.
दिवसेंदिवस तापमान उच्चांक गाठत असल्याने त्यामुळे सर्वांनाच झाडांच्या सावलीचा शोध घ्यावा लागणार आहे. तर परिसरात झाडांची कमतरता असल्याने सर्वजणच घामाघूम होणार, हे निश्चित आहे. निवडणूक निकाल जाहिर होणार असल्याने या ठिकाणी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यामुळे परिसराला छावणीचे रूप येणार असल्याचे चित्र निर्माण होणार आहे.