जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी ५ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:58 PM2018-02-06T23:58:40+5:302018-02-06T23:58:45+5:30
शेतातील टहाळ आणल्याच्या कारणावरून वाद घालत पाच जणांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षिदारास जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शेतातील टहाळ आणल्याच्या कारणावरून वाद घालत पाच जणांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षिदारास जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या भावास मारहाण केली. याप्रकरणी ६ फेब्रुवारी ५ जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील भागवत भिवाजी डोंगरे यांचा भाऊ संतोष व रामकिसनने शेतातील टहाळ का आणला, या कारणावरून आरोपींनी संगणमत करून डोंगरेसोबत वाद घातला. ही घटना ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. यावेळी आरोपींनी भागवत डोंगरे यांना जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच साक्षीदारास धक्काबुक्की करून रामकिसन यास लोखंडी गज, काठी व थापडबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी भागवत डोंगरे यांच्या फिर्यादीवरून मनोज प्रल्हाद भाकरे, साहेबराव सखाराम इंगळे, बालाजी प्रल्हाद भाकरे, राजू किसन भाकरे, प्रल्हाद नामदेव भाकरे यांच्याविरूद्ध गोरेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी गोरेगाव ठाण्याचे पोउपनि तिप्पलवाड यांनी भेट दिली होती.