कोविड सेंटरमध्ये थांबणाऱ्या ४९ नातेवाईकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:26+5:302021-05-26T04:30:26+5:30
हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये व रुग्णालयाच्या परिसरात आढळून आलेल्या ३५ पेक्षा अधिक नातेवाईकांना यापूर्वी लिंबाळा येथील विलगीकरण ...
हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये व रुग्णालयाच्या परिसरात आढळून आलेल्या ३५ पेक्षा अधिक नातेवाईकांना यापूर्वी लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाईकाने विलगीकरणाच्या भीतीने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारली होती. या घटनेनंतर रुग्णालय परिसर तसेच वार्डामध्ये आढळून येणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले. दरम्यान, २४ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या पाहणीत कोविड वार्ड व परिसरात रुग्णांचे ४९ नातेवाईक आढळून आले.
याप्रकरणी ग्रामसेवक सुभाष बागुल यांच्या तक्रारीवरून संतोष अवचार, सतीष सिद्धार्थ उघडे, रूषीकेश दिलीप अवचार, नामदेव अंजुना आलाटे, विलास सहादू खिल्लारे, सतीष रघुनाथ बुद्रूक, देवानंद बंडू घनघाव, सटवा गंगाराम करजतकर, विश्वनाथ दादाराव हाक्के, हनुमंत दादाराव हाके, शिवाजी विठ्ठल धानवे, बळीराम सुभाष काचगुंडे, दिलीप अर्जूनसिंह भारतद्वाज, संगमेश्वर शंकरअप्पा स्वामी, बबन नाथा वाकळे, शिवाजी महादू इंगळे, कृष्णा डिगांबर ढाकरे, संजय हरीभाऊ आडे, आबासाहेब तुकारामजी मुरकूटे, राजेश भाऊराव शिंदे, सारंगधर यशवंता टाले, रविंद्र भालेराव जाधव, योगेश रामभाऊ राठोड, धोंडबाराव कोंडबाराव खटाव, बबन किशन रिठ्ठे, गजानन घनश्याम रिठ्ठे, संजय मोकिदा कांबळे, मारोती विठ्ठल धनवे, मिलींद माधव धुळे, निखील माधव धुळे, शेख जावेद शेख कासम, शिवशरण टोमाजी फाटमोडे, ज्ञानेश्वर बाजीराव रहाटे, देविदास मोहन कुटे, अमोल भीमराव कांबळे, अन्नपूर्णा बांगर, अल्का अशोक काशिदे, भारती हरिभाऊ केसकर, दुर्गाबाई लक्ष्मणराव शिंदे, कान्होपात्रा धुरपत टाले, राधाबाई सुरेश पुंडगे, गोदावरी आश्रोबा कदम, सुजाता मारोती राऊत, निलावती काशिराम माने, शिलाबाई आनंदा खंदारे, सिंधूबाई विजय जाधव, ज्योती लक्ष्मण शेळके, सुदर्शन शेवलेकर, पंचफुला देवराव अवचार यांच्याविरूद्ध कलम १८८ भादवी व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ब प्रमाणे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.