Crime News: पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले वाँटेड; हिंगोलीत लागले आरोपींचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:50 PM2022-03-08T16:50:08+5:302022-03-08T16:50:40+5:30

तलवार व रॉडने मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

Crime News: Two son of police officer in wanted list; Banners of the accused in Hingoli | Crime News: पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले वाँटेड; हिंगोलीत लागले आरोपींचे बॅनर

Crime News: पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले वाँटेड; हिंगोलीत लागले आरोपींचे बॅनर

googlenewsNext

हिंगोली : तलवार व रॉडने मारहाण करून दोघांना गंभीर दुखापत केल्याची घटना हिंगोली तालुक्यातील बेलवाडी शिवारात २३ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी  गुन्हा दाखल होताच घटनेतील आरोपींनी पळ काढला. शोध घेऊनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी हिंगोलीतील चौकात चार आरोपींच्या वाँटेड बॅनर लटकविले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन आरोपी हिंगोली पोलीस दलातील जमादाराची मुले आहेत.  

हिंगोली तालुक्यातील बेलवाडी शिवारातील शेतात तानाजी बांगर यांचा आखाडा आहे. २३ फेब्रुवारी रोजी या आखाड्यावर शिवम सुरेश कुरील (रा. हिंगोली) हे असताना सागर काळे, विकी काळे, अभय चव्हाण, अक्षय गिरी उर्फ भल्ला, करण राजपूत (सर्व रा. हिंगोली) हे आखाड्यावर आले. यावेळी पाचही जणांनी तलवार व कोयत्याने शिवम कुरील यांना मारहाण केली. लोखंडी रॉडनेही पायावर मारून जखमी केले. साक्षीदारालाही तलवार, कत्ती व रॉडने मारहाण केली.

दोन आरोपी निघाले पोलीस जमादाराची मुले
याप्रकरणी दवाखान्यात उपचार घेऊन आल्यानंतर शिवम कुरील यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाचही जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच आरोपींनी पळ काढला. यातील सागर काळे, विकी काळे, करण राजपूत व अक्षय गिरी हे चार आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी चारही जणांच्या वॉटेंडचे बॅनर हिंगोलीच्या गांधी चौकात लावले आहे. यातील सागर काळे व विकी काळे हे दोन आरोपी हिंगोली पोलीस दलातील एका पोलीस अंमलदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. पाच पैकी दोन आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र इतर आरोपींचा पोलिसांना अद्याप शोध आहे.

Web Title: Crime News: Two son of police officer in wanted list; Banners of the accused in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.