मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:35 AM2021-08-25T04:35:01+5:302021-08-25T04:35:01+5:30
निवेदनात म्हटले की, नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे महाराज ...
निवेदनात म्हटले की, नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे मूक आंदोलन झाले. आंदोलनानंतर प्रशासनाने काही मराठा बांधवांवर गुन्हे दाखल केले. राज्यात सर्वच राजकीय पक्षाने विविध मोर्चे, यात्रा व इतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले. त्यावेळी कोणतेही गुन्हे दाखल झाले नाहीत. परंतु, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला असता, पोलीस प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगत मराठा समाजबांधवांवर गुन्हे दाखल केले असा आरोप केला.
मराठा बांधवांच्या पुढील भविष्याचा विचार करता, दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ, औरंगाबाद येथे काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चास सकल मराठा समाजाचा पाठिंबा असणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर पप्पू चव्हाण, कल्याण देशमुख, ॲड. अमोल जाधव, ॲड. नामदेव सपाटे, कपिल सावळे, ॲड. वैभव शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो नं.