वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अटळ; दंड तर भरावाच लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:07+5:302021-09-16T04:37:07+5:30

हिंगोली : वीज मीटरमध्ये फेरफार तसेच छेडछाड करण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वीज ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केल्यास ...

Criminal offenses are inevitable if the electricity meter is altered; The fine will have to be paid | वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अटळ; दंड तर भरावाच लागणार

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अटळ; दंड तर भरावाच लागणार

Next

हिंगोली : वीज मीटरमध्ये फेरफार तसेच छेडछाड करण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वीज ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा व कारवाई करण्यात येईल. आठ महिन्यांमध्ये १५० ग्राहकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये १५० वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडापोटी १८ लाख ९२ हजार ६४० रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. तेव्हा वीज ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड न करता जे बील येईल ते महावितरणकडे भरुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आठ महिन्यांतील कारवाई

जानेवारी

ग्राहक १७

वसूल दंड १८९०५०

फेब्रुवारी

ग्राहक १६

वसूल दंड ४४९४०१

मार्च

ग्राहक ०३

वसूल दंड ६३६३७

एप्रिल

ग्राहक ०३

वसूल दंड १२८९७

मे

ग्राहक ०३

वसूल दंड ९३४७३

जून

ग्राहक ०३

वसूल दंड ७२४९०

जुलै

ग्राहक ३४

वसूल दंड ८८६५७०

ऑगस्ट

ग्राहक ७१

वसूल दंड १२५१२२

फौजदारी गुन्हा व जबरी दंड...

वीजचोरी अथवा वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास १२६, १३५ व १५२ नुसार गुन्हा दाखल केला जातो. तेव्हा वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करु नये. काही अडचण आल्यास महावितरणच्या लाईनमन व अथवा कार्यालयाला कळवावे. जेणेकरुन मीटर बदलून देता येईल.

वीज चोरीसाठी अशीही चालाखी...

मीटरचे पिवळे वायर काढणे, लोहचुंबक मीटरवर ठेवणे, मीटर खासगी व्यक्तीला दाखविणे आदी प्रकार आढळून येतात. वीज चोरी पकडण्यासाठी पथक नेमले असून त्यात उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे, सचिन बेलसरे, सहायक अभियंता वैशाली मुंगले, सहायक लेखापाल सी. ए. ठाकूर यांचा समावेश आहे.

फेरफार करणे गुन्हाच...

मीटरमध्ये फेरफार करणे हा गंभीर गुन्हा आहे. मीटरमध्ये काही अडचण आली तर महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा लाईनमनला कळवावे.

- रजनी देशमुख, प्रभारी अधीक्षक अभियंता

डमी ११७२

Web Title: Criminal offenses are inevitable if the electricity meter is altered; The fine will have to be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.