पिकविमा आंदोलन; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:21 PM2023-01-23T12:21:54+5:302023-01-23T12:23:38+5:30

उपोषणामुळे  आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे चित्र बघता स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह परीसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे

Crop Insurance Movement; The health of hunger strikers deteriorated, angry farmers spilled milk on the streets | पिकविमा आंदोलन; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडले

पिकविमा आंदोलन; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडले

googlenewsNext

- दिलीप कावरखे 
गोरेगाव( जि. हिंगोली ):
येथील पिक विमा आंदोलनाला सहा दिवस होऊनही प्रशासनाकडून अपेक्षीत  दखल घेतली जात नसून उपोषणकर्त्यांच्या प्रक्रिया घालवल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांकडून २३ जानेवारी रोजी रस्त्यावर दूध सांडत संताप व्यक्त करण्यात आला .
लेखी आश्वासन देऊनही पिक विमा मिळाला नसल्याने दि . १८ जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे .

मात्र सदर आंदोलन संदर्भात शासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात गेली नसताना अन्नत्यागासोबत औषधोपचार नाकारत मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही अशी ठांम भूमिका आंदोलनकर्त्याकडून घेण्यात आली आहे. उपोषणामुळे  आंदोलनकर्त्यांच्या प्रकृत्या खालावत असल्याचे चित्र बघता स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह परीसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे .  दरम्यान मुख्यमार्गावर टायर पेटवून देण्यासह, पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविणे, कृषी कार्यालयावर काळे फेकणे आदी विवीध प्रकरणाच्या आंदोलनातून संतापाचा सूर निघत असून शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषावरून आंदोलनाला हिंसक वळण लागण्याचे चिन्ह दिसत आहे.
उपोषण आंदोलनाच्या सहाव्या दिवशी गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर दूध फेकून देत   शेतकऱ्यांकडून शासनाच्या मठ भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात आला प्रसंगी नामदेव पतंगे , जगन कावरखे ,संतोष कावरखे , संदीप डांगे , निसार सय्यद , अनिल कावरखे आदीसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Crop Insurance Movement; The health of hunger strikers deteriorated, angry farmers spilled milk on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.