जिल्ह्यात ३ लाख खातेदारांनी भरला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:17+5:302021-07-20T04:21:17+5:30

हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय औंढा ८३ हजार ४६९, कळमनुरी ५४ हजार ३४५, वसमत ८२ हजार ३५१, सेनगाव ५३ हजार २२६ ...

Crop insurance paid by 3 lakh account holders in the district | जिल्ह्यात ३ लाख खातेदारांनी भरला पीकविमा

जिल्ह्यात ३ लाख खातेदारांनी भरला पीकविमा

Next

हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय औंढा ८३ हजार ४६९, कळमनुरी ५४ हजार ३४५, वसमत ८२ हजार ३५१, सेनगाव ५३ हजार २२६ तर सर्वांत कमी हिंगोलीत ३४ हजार ७०८ खातेदारांनी पीकविमा भरला आहे. यामधून या शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार ६६३ हेक्टर पीक संरक्षित केले आहे. यात औंढा तालुक्यात २.४० कोटी, वसमत तालुक्यात ३.५९ कोटी, हिंगोली तालुक्यात १.५९ कोटी, कळमनुरी तालुक्यात ३ कोटी तर सेनगाव तालुक्यात २.६७ कोटी रुपये शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे भरले आहेत.

पीकविमा भरण्याची पहिली मुदत १५ जुलै रोजी संपली आहे. आता पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नाही. त्यांना पुन्हा चार दिवसांची संधी आहे. त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींमुळे पीकविमा भरता आला नाही. आता काहींची कर्जप्रकरणे होत असून अशांचाही विमा यानिमित्ताने काढला जाणार आहे.

तालुका व पीकनिहाय संरक्षित क्षेत्र

तालुका उडीद कापूस मूग तूर ज्वारी सोयाबीन

औंढा ११९७४ ५१९१ १४३३७ ११०६५ ११९८९ २८९१३

वसमत ६१५४ ६०९७ ९७५४ ७६२५ ७१३४ ४५५८७

हिंगोली १७५५ १२२० १९७३ ७३३६ ५४२ २१८८२

कळमनुरी २९०१ २११६ ३९१८ ८२९५ २०१९ ३५०९६

सेनगाव २६९१ १९८३ २५३९ १३२३४ ८९५ ३१८९४

Web Title: Crop insurance paid by 3 lakh account holders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.