संचारबंदीचे उल्लंघन; सात दुकानांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:53+5:302021-05-21T04:30:53+5:30
कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही काही व्यावसायिकांनी आपली दुकाने चालू करून संचारबंदी नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे सात व्यावसायिकांविरुद्ध नगर परिषद ...
कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही काही व्यावसायिकांनी आपली दुकाने चालू करून संचारबंदी नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे सात व्यावसायिकांविरुद्ध नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने २० मे रोजी कारवाई करीत १५ हजार १०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
यामध्ये काबरा जीन परिसरातील २ कापड दुकान, गांधी चौक येथील १ किराणा, २ कापड दुकान, जवाहर रोडवरील १ संगणक शोरूम, १ कापड दुकानाचा समावेश आहे. सदर व्यावसायिकांकडून ९ हजार, तर विनामास्क फिरणाऱ्या २३ व्यक्तींकडून ६ हजार १०० रुपये वसूल करण्यात आले. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, संदीप गायकवाड, डी. बी. ठाकूर, नितीन पहिनकर, मनोज बुर्से, सहायक पोलीस निरीक्षक काचगुंडे यांनी कारवाई केली आहे.