‘डिसेंबरनंतर कपास उपटून टाका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:40 PM2017-12-08T23:40:13+5:302017-12-08T23:40:17+5:30
शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे.
यंदा बोंडअळीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला. शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न तर मिळाले नाही, फवारण्यांचा खर्चही वाया गेला. शेंदरी बोंडअळी टाळण्यासाठी डिसेंबरनंतर हे पीक काढून पºहाट्याही ताबडतोब जागेवरून हलविण्याचे आवाहन केले. तर पीक फेरपालट करावा. मात्र अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके घेऊ नये, असे आवाहन केले. देशी कापूस, पारंपरिक बिगर बी.टी.कापूस, उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय पीक म्हणून लावावे. कामगंध सापळे किंवा हिरवी बोंडे फोडून नियमितपणे बी.टी. कपासीचे सर्वेक्षण करावे. हंगामात शेतामध्ये तर संपल्यावर जिनिंग मिलजवळ हे सापळे लावावे. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे जमा करून नष्ट करावीत, डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यांसह नष्ट कराव्यात. तर पºहाटी उपटल्यानंतर शेताची खोल नांगरटी करून कोष नष्ट करावे. तर कमी कालावधीचे पीक निवडावे, असे आवाहन कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले.