दलित वस्त्या झाल्या प्रकाशमान
By admin | Published: January 30, 2015 02:53 PM2015-01-30T14:53:07+5:302015-01-30T14:53:07+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील चार दलित वस्त्यांत खा. राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निधीतून सौरदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या अंधारवस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील चार दलित वस्त्यांत खा. राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निधीतून सौरदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या अंधारवस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत.
तालुक्यातील पिंपळदरी, जलालदाभा या गावांसह औंढा नागनाथ येथील दोन वस्त्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी २८ सौरदिवे बसविण्यात आले आहेत. वाढत्या भारनियमनासह नादुरुस्तीच्या अडचणीमुळे अनेक भागात पथदिवे कधी चालतच नसायचे. पावसाळय़ात तर ही समस्या अधिक गंभीर होत होती. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सातव यांच्याकडे नियमित वीजपुरवठय़ासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. यावर उपाय निघणे सोपे नव्हते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री निधीतून रकमेची तजविज केल्यानंतर या गावांत हे सौरदिवे बसविले आहेत. वीज खंडित झाल्याने अंधाराचा सामना करण्याची झंझटही दूर झाली. आता कोणतेही वीजबिल न येता दररोज सायंकाळी या गावांमध्ये सौरदिव्यांचा झगमगाट पहायला मिळत आहे.