संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:29 AM2021-02-10T04:29:57+5:302021-02-10T04:29:57+5:30
हिंगोली : केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या दोघांकडून इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल आकारणी करण्यात येत आहे. यामुळे ...
हिंगोली : केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या दोघांकडून इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल आकारणी करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक कुंचबणा होत आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीजबिल विरोधात संभाजी ब्रिगेडकडून ९ फेब्रुवारी राेजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीजबिलाबाबत निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, केंद्र सरकार, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार दोघे मिळून सर्वसामान्य जनतेची आर्थिक कुंचबणा करीत आहेत. केंद्र सरकारने प्रचंड मोठी इंधन दरवाढ केली आहे. तर राज्य सरकारने वाढीव वीजबिल आकारणी करून सर्वसामान्य जनतेचे खिसे कापले आहेत. यासाठी या दोन्ही सरकार सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल मागे घ्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश ॲड. अध्यक्ष मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष सतीश महागांवकर, राम पुंड, माराेती कऱ्हाळे, नामदेव कदम, विजय डाढाळे, ज्ञानेश्वर माकणे, अलाेक इंगाेले, कृष्णा जाधव, नितीन भाेसले, नारायण खराटे, अंकुश व्यवहारे, राजू जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. फाेटाे नं. ०२