तलाठ्यास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:55 AM2018-02-16T00:55:54+5:302018-02-16T00:55:58+5:30
येथून जवळच असलेल्या असोला येथील कॅनॉलशेजारी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू घेवून जाताना अडविल्याने तलाठ्याला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळाबाजार : येथून जवळच असलेल्या असोला येथील कॅनॉलशेजारी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू घेवून जाताना अडविल्याने तलाठ्याला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
असोला कॅनालजवळ एक ट्रक्टर वाळू वाहतूक करीत असताना औंढा नागनाथ तहसीलच्या विशेष पथकातील कर्मचारी आनंद किसनराव रेनगडे यांनी १४ फेब्रुवारी रोजी सदर ट्रक्टर पकडले. पंचनामा करीत असताना त्यांना बालाजी नागरे याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा केला. आरोपीने दुसºयाच्या हातून जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तलाठी आनंद किसनराव रेनगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी शिवाजी नागरे (रा. असोला ता. औंढा नागनाथ) याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शेख खुद्दूस करीत आहेत.
दरम्यान, शासकीय कामात अडथळा करणाºया आरोपीस १५ फेबु्रवारी रोजी औंढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे सरकारी वकील चेतन अग्रवाल यांनी सांगितले.