महाविद्यालय परिसरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:57 AM2021-02-28T04:57:32+5:302021-02-28T04:57:32+5:30

पाणी उपलब्धतेची मागणी हिंगोली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी नसल्यामुळे कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी मोठा त्रास होत ...

Darkness on college campus | महाविद्यालय परिसरात अंधार

महाविद्यालय परिसरात अंधार

Next

पाणी उपलब्धतेची मागणी

हिंगोली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी नसल्यामुळे कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी मोठा त्रास होत आहे. बऱ्याच कार्यालयात पाणी नसल्यामुळे नागरिकांना तासंतास पाण्यावाचून राहावे लागत आहे. यामुळे शासकीय कार्यालयात पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी होत आहे.

रस्ता दुरूस्त करण्याची मागणी

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव - फाळेगाव फाट्यापर्यंत असणाऱ्या अडीच किमी रस्त्याचे अर्धवटच काम झाले आहे. सुमारे दीड किमीपर्यंत रस्ता व्यवस्थित असून एक किमीचे अंतर पूर्णपणे उखडलेले आहे. यामुळे एक किमीचा रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

हरभरा काढणीला आला वेग

कळमनुरी : तालुक्यातील शेतशिवारामध्ये शेतकरी व शेतमजुर हरभरा काढणीच्या कामात मग्न झालेला आहे. सध्या हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. खरीप पिकांपासून काहीच पदरी न पडल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकातील या पिकावर मोठी आशा लागली आहे.

Web Title: Darkness on college campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.