लॉकडाऊनमध्येही 'दे दारू'; दुकाने बंद असूनही विक्री जोरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:28 AM2021-05-22T04:28:11+5:302021-05-22T04:28:11+5:30

रांगा लावून मिळविली होती दारू हिंगोली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून बहुतांश दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. ...

‘De boo’ even in lockdown; Sales loud despite shops closed! | लॉकडाऊनमध्येही 'दे दारू'; दुकाने बंद असूनही विक्री जोरात !

लॉकडाऊनमध्येही 'दे दारू'; दुकाने बंद असूनही विक्री जोरात !

Next

रांगा लावून मिळविली होती दारू

हिंगोली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून बहुतांश दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात सर्वच व्यवहार ठप्प असतानाही दारू विक्रीला मात्र फारसा फटका बसला नसल्याचे दिसत आहे. कोरोना काळातही बिअर वगळता इतर दारूच्या विक्रीत थोड्याअधिक फरकाने वाढच झाली आहे. यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूलही प्राप्त झाला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होेते. यामुळे बाजारपेठेसह शासकीय कार्यालयांवरही मर्यादा आल्या होत्या. देशी, विदेशी दारूसह बिअर दुकानेही बंद ठेवली होती. एप्रिल २०२० मध्ये तर पूर्ण महिना मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली होती. या काळात चढ्या दराने खरेदी करून मद्यपींनी दारूची तहान भागविली होती. बहुतांश दिवस कडक निर्बंध असतानाही मद्य विक्री थांबलेली दिसत नव्हती. बिअर विक्री वगळली, तर देशी, विदेशी दारूसह वाईन विक्रीतही किंचित का होईना, २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये विक्रीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. देशी दारूच्या विक्रीत ०.१९, विदेशी दारूच्या विक्रीत ४.९४, तर वाईनच्या विक्रीत १२३.५८ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात मद्य विक्रीची दुकाने उघडल्यानंतर हजारो मद्यपींनी दारूसाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी आठ दिवस पुरेल एवढा साठा करून दारूची तहान भागविली.

महसूलला दारूचा आधार

- गतवर्षी जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. आताही कोरोनामुळे कडक निर्बंध लागू आहेत. सर्व व्यवहार ठप्प असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने शासनाला महसूल मिळवून देण्यात मोठा हातभार लावला.

- २०२० मध्ये एप्रिल महिन्यात २८ लाख ४६ हजार १११ रुपये महसूल मिळाला. मे मध्ये १२ लाख ९५ हजार ९३५ रुपये, जूनमध्ये ४ लाख ३९ हजार ६८ रुपये, जुलैमध्ये ६ लाख ७३ हजार ८४३ रुपये, ऑगस्टमध्ये १ हजार, सप्टेंबरमध्ये ५० लाख ५७२ रुपये, ऑक्टोबरमध्ये ६६ लाख ३ हजार १०९ रुपये, नोव्हेंबरमध्ये ६९ हजार ९४० रुपये, डिसेंबरमध्ये १० लाख ५५ हजार ६५५ रुपयांचा महसूल मिळाला.

बिअर विक्री घटली, विदेशी वाढली

- २०१९ - २० मध्ये बिअरची विक्री ६७७९७० बल्क लिटर झाली होती, तर २०२०-२१ मध्ये एप्रिल ते फेब्रुवारीअखेर ५५७१८४ बल्क लिटर बिअरची विक्री झाली. यामध्ये तब्बल १२०७८६ बल्क लिटर बिअरमध्ये घट झाली आहे.

- विदेशी दारूमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसत आहे. २०१९- २० मध्ये एप्रिल ते फेब्रुवारी या काळात ७४५००७ बल्क लिटर विदेशी दारूची विक्री झाली होती, तर २०२०-२१ मध्ये ७८१८१४ बल्क लिटर विदेशी दारूची विक्री झाली. यामध्ये ३६८०७ बल्क लिटर वाढ झाली.

-

अवैध दारू रोखण्याची जबाबदारी पोलिसांवरच

येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे दरवेळी ठरलेल्या विक्रेत्यांकडूनच अवैध दारू जप्त केल्याचा सोपस्कार पार पाडला जातो. त्यामुळे अवैध दारू रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाला पार पाडावे लागते. पोलिसांमुळे अवैध दारू विक्रीला लगाम लागला आहे.

देशी दारूच्या विक्रीत वाढ

विदेशी, बिअर, वाईन दारू पिणाऱ्या मद्यपींना लॉकडाऊन काळात देशी दारू मिळणेही अवघड बनले होते. अनेकांनी देशी दारूवरच तल्लफ भागविली. त्यामुळे एप्रिल ते फेब्रुवारी २०१९-२० मध्ये ३६८३७२७ बल्क लिटर दारू विक्री झाली होती, तर २०२०-२१ मध्ये ३७१८८१७ बल्क लिटर दारू विक्री झाली. या काळात ३५०९० बल्क लिटर दारू विक्रीत वाढ झाली.

एक कोटी बल्क लिटर दारू रिचवली

२०१९-२० - ५११०५६७

२०२०-२१ - ५०६६४५२

बल्क लिटर

२०२०-२१ मध्ये विक्री बल्क लिटरमध्ये

दारू - ३७१८८१७

विदेशी - ७८१८१४

बिअर - ५५७१८४

Web Title: ‘De boo’ even in lockdown; Sales loud despite shops closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.