हिंगोलीत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:25 PM2019-04-12T18:25:09+5:302019-04-12T18:25:43+5:30
उपचारासाठी परभणीला नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला
जवळा बाजार ( जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथील एका शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे
औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथील शेतकरी भगवान नारायण शेळके (४५) हे सकाळपासून आपल्या शेतात तूरीचे धसकटे जमा करीत होते. दोन गाडीबैल भरुन तुरीचे धसकटे जमा केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर शेजारील शेतकरी रामप्रसाद शेळके यांनी त्यांना तत्काळ गावाकडे आणले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी परभणीला नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
शेतात उन्हात काम केल्याने उष्मघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. शेतात काम करत असताना अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.