शववाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:13+5:302021-04-28T04:32:13+5:30
जिल्ह्यात २३ मार्च, २०२० पासून कोरोनाने शिरकाव केला आहे, तेव्हापासून अहोरात्र सर्वच वाहक जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या ...
जिल्ह्यात २३ मार्च, २०२० पासून कोरोनाने शिरकाव केला आहे, तेव्हापासून अहोरात्र सर्वच वाहक जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. कधी-कधी मृत्यूसोबतही प्रवास करण्याची वेळ चालकांवर येते. जिल्ह्यात एकूण १२ रुग्णवाहिका असून, यामध्ये कोविड रुग्णांसाठी ६ तर नाॅनकोविड रुग्णांसाठी ६ रुग्णवाहिका आजमितीस कार्यरत अहेत. १२ रुग्णवाहिकेवर २४ चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत विकास ग्रुपच्या वतीने २४ चालकांना पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य दिले जाते. रुग्णवाहिकेच्या सर्व चालकांची पुरेपूर अशी काळजी घेतली जाते.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे शासनाने संरक्षणार्थ ‘पीपीई’ किट दिली आहे, परंतु उन्हाची दाहकता पाहता ‘पीपीई’ किट नकोसे वाटत आहे. नाही म्हणून कसे चालेल, असे म्हणत ‘पीपीई’ किट घालून आज आम्ही सर्व चालक मंडळी मृत्यूसोबत प्रवास करतो आहोत. दुसरीकडे ‘पीपीई’ किटमुळे जीव गुदमरतोय, अशी प्रतिक्रिया काही चालकांनी व्यक्त केली. शासन व ‘बिविजी’ ग्रुप सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचेही चालकांनी सांगितले.