दोन नराधमांना फाशीची शिक्षा
By admin | Published: April 7, 2017 04:19 PM2017-04-07T16:19:08+5:302017-04-07T16:19:08+5:30
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे ५ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणाºया दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी. दिवटे यांनी
Next
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 07 - कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे ५ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणाºया दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी. दिवटे यांनी ७ एप्रिल रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर यात पुरावा नष्ट करण्यास मदत करणा-या पाच जणांची सबळ पुराव्याअभावी काल निर्दोष मुक्तता केली होती.
वारंगा मसाई येथील सदर ४ वर्षीय चिमुकली अंगणवाडीची शाळा सुटल्यानंतर ७ जानेवारी २0१६ रोजी घरी आली होती. जेवण करून ती बाहेर गेली अन् परतलीच नाही. त्यानंतर ती शोध घेवूनही सापडत नव्हती. काळजीपोटी दुपारी ३.३0 च्या सुमारास गावातील मसाराव वाघमारे यांनी पार्डी येथे मजुरीस गेलेल्या तिच्या वडिलांना ही बाब भ्रमणध्वनीवरून कळविली. तिच्या वडिलांनी साडेचारच्या सुमारास गावात आले. घरी त्यांची आई, सावत्र आई, पत्नी, भाऊ व मित्र होता. चौकशी सुरू केली. तेव्हा सावत्र आईने सांगितले की, ही मुलगी जेवण करून दारात बहिणीसोबत खेळत होती. त्यानंतर भागवत परबती क्षीरसागर व राहुल ऊर्फ सतीश बबन क्षीरसागर हे दोघे तेथे आले. त्यांनी या चिमुकलीस चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानावर नेले. तेव्हापासून ते दोघे व ही मुलगीही परतली नाही.
यानंतर पुन्हा फिर्यादी तथा पीडित मयताच्या पित्याने गावक-यांना सोबत घेवून मुलीचा शोध घेतला. त्यानंतर ते कळमनुरी पोलिस ठाण्यात गेले. पोलिस येईपर्यंत रात्र झाली होती. त्यानंतर ग्रामस्थ व पोलिसांनी परबती यशवंता क्षीरसागर यांच्या घरात शोधला घेता असता मुलगी पांढºया रंगाच्या पोत्यात बांधून ठेवल्याचे आढळले. ती मृत झाली होती. तर तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला होता. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. शिवाय तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे दिसत होते. त्यानंतर याबाबतची फिर्याद फौजदार पी.एस. गोमासे यांनी नोंदवून घेतली. यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमासह विविध कलमान्वये भागवत परबती क्षीरसागर (१८), राहुल बबन क्षीरसागर (२१), परबती यशवंता क्षीरसागर, बबन खंडुजी क्षीरसागर, कवीनारायण परबती क्षीरसागर, पंचफुलाबाई परबती क्षीरसागर, शोभाबाई बबन क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तर तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केला. त्यांच्या बदलीनंतर उपविभागीय अधिकारी प्रसन्न मोरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
बालसंरक्षण विशेष खटला विशेष अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश एम.पी.दिवटे यांच्यासमोर चालविण्यात आला. यात एकूण २५ साक्षीदार तपासले होते. तर भक्कम पुरावेही सादर करण्यात आले. यात भागवत व राहुल या दोघांचा गुन्हा सिद्ध झाला. तर इतर आरोपींना कालच सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करून निकाल राखून ठेवण्यात आला होता. यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. ज्ञानेश्वर टेकनूर यांनी काम पाहिले.
अशी झाली शिक्षा
राहुल व भागवतला भा.दं.वि.च्या क.३६३ नुसार ७ वर्षे शिक्षा व ५00 रुपये दंड तर दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, क.३६६ नुसार १0 वर्षे शिक्षा व १ हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास ६ महिने कारावास, कलम ३७६ नुसार आजन्म कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास, क.३७७ नुसार आजन्म कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास, कलम २0१ नुसार ७ वर्षे शिक्षा व ५00 रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर क.३0२ भादंविनुसार भागवत व राहुलला फाशीची शिक्षा ठोठावली असून उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे.