लसीकरणाने मृत्यू, नपुंसकत्वाची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:06+5:302021-05-31T04:22:06+5:30

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस जवळपास एक लाख तर दोन्ही डोस घेणारे ४० हजार आहेत. त्यामुळे केवळ ४ टक्केच ...

Death by vaccination, rumors of impotence; Exercise of officers in rural areas! | लसीकरणाने मृत्यू, नपुंसकत्वाची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत !

लसीकरणाने मृत्यू, नपुंसकत्वाची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत !

Next

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस जवळपास एक लाख तर दोन्ही डोस घेणारे ४० हजार आहेत. त्यामुळे केवळ ४ टक्केच परिपूर्ण लसीकरण तर अर्धवट १० टक्के झाले आहे. आणखी ९ लाख जणांना दोन्ही डोस देणे बाकी आहे. तरीही लसीकरणासाठी केंद्रावर कुणी फारशी गर्दी करीत नसल्याचे चित्र आहे. यामागची कारणे वेगवेगळी आहेत. यात अफवांना बळी पडणाऱ्यांची संख्याच जास्त दिसून येत आहे. त्यात ही लस घेतली की नपुंसकत्व येऊ शकते. त्याचबरोबर कुणीतरी व्हॉटस्ॲपवर खोडसाळपणाने एक ते दोन वर्षांत मृत्यू ओढवू शकतो, असेही व्हायरल केले. काहींनी ही लस घेतली की कोरोना होतो, अशा अफवा पसरवल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आरोग्य विभागाने आर्जव करूनही कुणी लसीकरण केंद्रावर फिरकत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

काय आहेत अफवा

अशी आहे पहिली अफवा

शासनाला लोकसंख्या कमी करायची आहे. ही लस घेतली की, नपुंसकत्व येते. शिवाय महिलांमध्येही वांझपणा येऊ शकतो.

अशी आहे दुसरी अफवा

ही लस घेतली म्हणजे जो ताप येतो ते दुसरे काही नसून काेरोनाचेच लक्षण आहे. तपासणी केली तर नक्कीच संबंधित व्यक्ती बाधित आढळतो.

अशी आहे तिसरी अफवा

कोरोनावरील लस घेतलेल्या माणसांचे आयुष्य आणखी एक ते दीड वर्षच राहणार आहे. त्यानंतर मात्र त्यांना इतर आजार जडून त्यांचा मृत्यू ओढवू शकतो.

अधिकारी म्हणतात...

कोरोनावरील सर्व लसींच्या वारंवार चाचण्या झाल्या. त्या एकदम सुरक्षित आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. त्याचे फायदेही समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे. -डाॅ.नामदेव कोरडे, हिंगोली

ग्रामीण भागात आतापर्यंत झालेले लसीकरण

जिल्हांतर्गत झालेले लसीकरण

ज्येष्ठ नागरिक

पहिला डोस ४३१३८, दुसरा डोस ११६१०

वय ४५ ते ६०

पहिला डोस ३४५०६, दुसरा डोस १०९४०

वय १८ ते ४५

पहिला डोस ५७८५

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस ६९७४, दुसरा डोस ४४५९

फ्रंटलाईन वर्कर

पहिला डोस १२३३४, दुसरा डोस ४०३३

Web Title: Death by vaccination, rumors of impotence; Exercise of officers in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.