पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:20 AM2018-11-17T00:20:54+5:302018-11-17T00:21:08+5:30
सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
कडोळी : सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता.
याबाबत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले की, पीडिता शेख बुसराबी भ्र. अजमदखॉ पठाण (२६) सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेऊन छळ केला. शारिरीक व मानसिक त्रास सहन न झाल्याने सदरील महिलेने आपल्या माहेरी कडोळी येथे ११ नोव्हेंबर रोजी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते. त्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सासरची मंडळी चारित्र्यावर संशय घेत असून पती मारहाण करुन छळ करत असल्याचे तिने म्हटले आहे. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामधे पती अमजतखॉ वहिद खॉ पठाण, शेख रशिद शेख लतीफ, शेख असीफ बाबामिया, हसीनाबी इब्राहिमखॉ पठाण, शकीलाबी भ्र शेख जमिल, मेहरुबी भ्र. शेख मुख्तार सर्व रा. वाघी खु., ता. रिसोड, जि. वाशिम येथील रहिवासी आहेत. सदरील महिलेचा १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि माधव कोरंटलू यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शेळके व भुजबळ हे करीत आहेत.