कर्जमाफीतील शेतकरीसंख्या ९४१0 वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:49 PM2017-12-12T23:49:06+5:302017-12-12T23:49:43+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकºयांना १ लाख ५0 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार ८९७ शेतकरी पात्र असून ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४0 कोटी ८५ लाख रुपये जमा केले आहेत. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.पी. मैत्रेवार यांनी दिली आहे.
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकºयांना १ लाख ५0 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार ८९७ शेतकरी पात्र असून ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४0 कोटी ८५ लाख रुपये जमा केले आहेत. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.पी. मैत्रेवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ११ डिसेंबर २0१७ अखेर ३ हजार ४0 शेतकºयांच्या खात्यात ५ कोटी ५८ लाख रुपये जमा केले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात ७३७ शेतकºयांच्या खात्यात ८२ लाख रुपये जमा केले आहेत. तर जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकांकडून ११ डिसेंबर २0१७ अखेर १ हजार ८५१ शेतकºयांच्या खात्यात १0 कोटी ७६ लाख रुपये जमा केले आहेत. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत ४ हजार ५२ शेतकºयांच्या खात्यात २३ कोटी ६९ लाख रुपये जमा केले आहेत. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात एकूण ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४0 कोटी ८५ लाख रुपये जमा केले आहेत.
यात शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन व बँक स्तरावरुन कर्जाची माहिती व लेखापरीक्षण करुन माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकºयांची ग्रीन लिस्ट बँकांना दिली आहे. यानुसार बँकेमार्फत संबंधित शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरित होत आहे. तर बँकेकडून एसएमएसही पाठविला जात आहे.