कर्जमाफी पोहोचली ५८१ कोटींवर, १२ हजार शेतकरी शिल्लकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:39 AM2021-01-08T05:39:06+5:302021-01-08T05:39:06+5:30
कोरोनामुळे मागील काही काळात या योजनेतील कामाची गती संथ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या याद्या वारंवार येत असल्या तरीही अनेक ...
कोरोनामुळे मागील काही काळात या योजनेतील कामाची गती संथ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या याद्या वारंवार येत असल्या तरीही अनेक शेतकऱ्यांचे खाते त्रुटीत असल्याने पोर्टलवरून विशिष्ट क्रमांकच आला नसल्याचे दिसून येत आहे. यातील किती बाद होणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मात्र, विशिष्ट क्रमांक मिळालेल्याही साडेचार हजार खातेदारांच्या खात्यावर अजून कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यात मोठा लाभ मिळाला आहे. आतापर्यंतच ५८१ कोटी रुपये जमा झाले असून आता साडेसहाशे कोटींपर्यंत कर्जमुक्ती जाण्याची शक्यता दिसत आहे.
दाेन हजार तक्रारींचे निवारण
हिंगोली जिल्ह्यात विविध कारणांनी जिल्हा अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडेही दोन हजारांवर प्रकरणे आली होती. यात आधार क्रमांक, खातेक्रमांक, कर्जमाफीची ळत नसलेली रक्कम आदी कारणे होती. यात जिल्हास्तरीय समितीकडे २१६२ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी त्यांनी १०६६ तक्रारींचे निवारण केले तर १२ प्रलंबित आहेत. तालुकास्तरीय समितीकडे १०५५ तक्रारी गेल्या होत्या. त्यापैकी २९ प्रलंबित आहेत. तालुकास्तरीय समितीकडे प्रलंबित तक्रारींचे प्रमाण जास्त दिसत आहे.