व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभागाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:34 AM2018-09-28T00:34:46+5:302018-09-28T00:35:04+5:30
व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत.
हिंगोली येथील व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया यांनी सांगितले.
भारतातील व्यापारास संरक्षण द्यावे, आॅनलाईन विक्री व्यवहार बंद करावा, व्यापारी विरोधी कायदे रद्द करा, वॉलमॉर्ट, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेशबंद करावा आदी मागण्यांसाठी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय येथील व्यापारी महासंघाने घेतला आहे. व्यापाºयांनी या बंदबाबत प्रशासनासही निवेदन दिले. तर व्यापाºयांनी यात सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
व्यापाºयांची बैठक
वसमत : २८ सप्टेंबर रोजी आयोजित भारत बंदमध्ये वसमतचा सहभाग नोंदवण्यासाठी वसमतमध्ये व्यापाºयांची बैठक पार पडली. यावेळी सुभाष लालपोतू, नवीनकुमार चौकडा, मन्मथआप्पा बेले, दीपक कुल्थे, गजानन कापूसकरी, राजेंद्र लालपोतू, लक्ष्मीकांत कोसलगे, रमेश आदी पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते.
बाळापुरातही आवाहन
आखाडा बाळापूर : व्यापारी महासंघाने पुकारलेल्या भारत बंदमध्ये आखाडा बाळापूर येथील व्यापारी सहभागी होणार असून संपूर्ण व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवणार असल्याचे निवेदन व्यापारी असोसिएशनच्यावतीने पोलिसांना दिली आहे.व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास अमिलकंठवार, भैरूसेठ वर्मा यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.
कळमनुरी बंदचे आवाहन
कळमनुरी : विविध मागण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी व्यापाºयांच्या वतीने भारतबंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सहभागी होवून कळमनुरी बंदचे आवाहन येथील व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रकांत देशमुख, गजानन खोतकर, म. तनवीर नाईक, नंदकिशोर सारडा, अविनाश बुर्से, नरेंद्र रेखावार, सुहास गुंजकर, जावेद खान, म. साजीद आदींची उपस्थिती होती.