पैसेवारी येताच दुष्काळाची घोषणा
By Admin | Published: August 31, 2015 12:50 PM2015-08-31T12:50:06+5:302015-08-31T12:50:49+5:30
पावसाअभावी मराठवाड्यात यंदाही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य सरकार अंतिम पैसेवारीची वाट पाहणार नाही.
औरंगाबाद : पावसाअभावी मराठवाड्यात यंदाही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य सरकार अंतिम पैसेवारीची वाट पाहणार नाही. सप्टेंबर महिन्यात प्राथमिक पैसेवारी येताच दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या उद््घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळाच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि माझी नुकतीच बैठक झाली. त्यात वरील बाब ठरली असेही दानवे यांनी नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले, दुष्काळ निवारणासाठीच्या सर्व उपाययोजना सरकारकडून करण्यात येत आहेत. मजुरांच्या हाताला काम, जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि कर्जाचे पुनर्गठण यासारख्या कामांवर लक्ष दिले जात आहे. दुष्काळाची अंतिम पैसेवारी जानेवारीत घोषित होते; परंतु दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार तोपर्यंत वाट पाहणार नाही. त्याआधीच म्हणजे सप्टेंबरमध्ये प्राथमिक पैसेवारी येताच दुष्काळाची घोषणा केली जाईल. गावागावांत जाणार