कोराेना तपासणी अहवालावरील विलंबाला उपाय सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:29 AM2021-04-25T04:29:46+5:302021-04-25T04:29:46+5:30

लॅबमध्ये थेट विचारणा करण्यासाठी अनेकजण धडपडत असल्याचे दिसत होते. तेथेही एसआरएफ आयडी असेल आणि स्वॅब पोहोचले तरच माहिती मिळते. ...

The delay on the Coraine inspection report could not be remedied | कोराेना तपासणी अहवालावरील विलंबाला उपाय सापडेना

कोराेना तपासणी अहवालावरील विलंबाला उपाय सापडेना

Next

लॅबमध्ये थेट विचारणा करण्यासाठी अनेकजण धडपडत असल्याचे दिसत होते. तेथेही एसआरएफ आयडी असेल आणि स्वॅब पोहोचले तरच माहिती मिळते. मात्र या लॅबपर्यंत हे स्वॅबच पोहोचले नव्हते. तिसऱ्या दिवशीही स्वॅब पोहोचत नसतील तर याचे अहवाल कधी मिळणार? हा प्रश्नच आहे. एवढ्या कालावधीत रुग्णांची प्रकृती आणखीच बिघडत असून याला जबाबदार कुणाला धरायचे? असा प्रश्न आहे.

याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, असा प्रकार घडत असेल तर ते गंभीर आहे. यामध्ये आजच आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील. ज्या दिवशीचे स्वॅब त्याच दिवशी प्रयोगशाळेत पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. शिवाय सध्या तीन शिफ्टमध्ये लॅबचे काम चालते. ते चार शिफ्टमध्ये करून अहवाल वेळेत येतील याची काळजी घेतली जाईल. यानंतरही ही समस्या राहिली तर कारवाई करावी लागेल.

Web Title: The delay on the Coraine inspection report could not be remedied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.