‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:38 AM2018-08-03T00:38:45+5:302018-08-03T00:39:53+5:30

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयात सादर करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. सदर माहिती २८ जुलैपर्यंत देण्याच्या सूचना होत्या. मात्र एकाही तालुक्यातून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

 Delayed information about 'out of school' | ‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब

‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयात सादर करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. सदर माहिती २८ जुलैपर्यंत देण्याच्या सूचना होत्या. मात्र एकाही तालुक्यातून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, या दृष्टिकोनातून लोकचळवळ राबवून शाळाबाह्य मुलांना थेट प्रवेश देण्याच्या शासनाचे आदेश आहेत. परिसरात कोठेही आणि केव्हाही शाळाबाह्य मूल आढळून आल्यास तेथील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांनी त्यास तत्काळ जवळच्या शाळेत प्रवेशित करण्याची जबाबदारी आहे. बालरक्षकाची यात महत्त्वाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी २८ जुलैपर्यंत सर्व शिक्षा जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना होत्या. परंतु एकाही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांनी ही माहिती सादर केली नाही. त्यामुळे ते ही माहिती सादर करण्यास दिरंगाई करीत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाकडून संबधित गशिअ यांना स्मरणपत्र देऊन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. शोध घेऊन शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत जात आहेत का? बाहेर जिल्ह्यातून हिंगोलीत दाखल झालेले शाळाबाह्य मुले किती? याप्रमाणे अद्ययावत माहिती सादर करण्याच्या सूचना होत्या.
कामाच्या शोधात स्थलांरित झालेल्या कुटुंबांतील बालक जर गावातीलच नातेवाईकांकडे राहत असेल तर शिक्षण विभागाची यंत्रणा तेथे पोहोचून नातेवाईकांना मार्गदर्शन करून बालकास शाळेत पाठविण्याची विनंती केली जाणार आहे. यासाठी पालकांच्या सभाही भरविण्याचे नियोजन
करण्यात आले होते. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचनाही प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्या होत्या. शिवाय शिक्षकांनी बालरक्षक म्हणून नोंदणी करावी व शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यावा, असे सुचविले होते.
‘शाळाबाह्य मुलांचा शोध’ यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. बालरक्षक व लोकचळवळ राबविण्याचे नियोजन होते.

Web Title:  Delayed information about 'out of school'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.