५८ हजार मे.टन खताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:35 PM2018-05-06T23:35:13+5:302018-05-06T23:35:13+5:30

यंदा खरीप हंगामात लागणाऱ्या विविध प्रकारच्या खतांचे आवंटन ५८ हजार १२0 मे.टन एवढे मंजूर झाले असून त्याची आवकही जिल्ह्यात सुरू झाली आहे. हे खत सप्टेंबर महिन्यापर्यंत येथे दाखल होणार आहे.

 Demand for 58 thousand MT of fertilizer | ५८ हजार मे.टन खताची मागणी

५८ हजार मे.टन खताची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा खरीप हंगामात लागणाऱ्या विविध प्रकारच्या खतांचे आवंटन ५८ हजार १२0 मे.टन एवढे मंजूर झाले असून त्याची आवकही जिल्ह्यात सुरू झाली आहे. हे खत सप्टेंबर महिन्यापर्यंत येथे दाखल होणार आहे.
यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या खतांचा समावेश आहे. यात एप्रिल महिन्यात ६८८0 मे. टन, मे महिन्यात ८0६0 मे.टन, जून महिन्यात १२ हजार ८१0, जुलै महिन्यात ११ हजार २३0, आॅगस्ट महिन्यात १0 हजार ७00, सप्टेंबर महिन्यात ८४४0 मे.टन खताची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया १७ हजार २६0 मे.टन, डीएपी-१0८१0 मे. टन, एमओपी-४ हजार मे.टन, एनपीके १७ ३४0 मेटन, एसएसपी ८७१0, मे. टन खताचा समावेश आहे.
दिवसेंदिवस शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी करू लागला आहे. त्यातच ऐन हंगामात होणारी खतासाठीची धावपळ लक्षात घेता अनेक शेतकरी उन्हाळ्यातच खते व बी-बियाणांची तयारी करतानाही दिसत आहेत. कृषी केंद्रांवर खते व कृषी वाणांच्या दराची चौकशी करण्यात येत असल्याचे दिसते.
सध्या खताची आवकही सुरू झाली आहे. हिंगोली येथील रेल्वेस्थानकावर मागील दोन दिवसांपासून खताच्या रॅक लागत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी खत उतरविण्याचे काम जोमात सुरू आहे. जिल्हाभरात डीएपी व २0.२0.१३ या खताचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे. तळपत्या उन्हातही कामगार हे खत उतरविताना दिसत आहेत.

Web Title:  Demand for 58 thousand MT of fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.