मग्रारोहयोच्या कामांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:44 PM2018-01-08T23:44:32+5:302018-01-08T23:44:47+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे हिंगोली पंचायत समितीकडून सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. ती सुरू न केल्यास १६ जानेवारी रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव कोरडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे हिंगोली पंचायत समितीकडून सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. ती सुरू न केल्यास १६ जानेवारी रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव कोरडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले की, सध्या कोरडवाहू शेतीचा हंगाम संपला आहे. रबीतील पिके निघण्यास आणखी वेळ आहे. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला कोणतेच काम नाही. परिणामी, मजुरांकडे स्थलांतर करण्याशिवाय कोणतेच गत्यंतर उरले नाही. त्यामुळे सिंचन विहिरींची कामे प्राधान्याने सुरू करा, अर्धवट शेततळे, पाणंद रस्ते आदी कामे सुरू करा, अर्धवट असलेल्या ३0 बाय ३0 च्या शेततळ्यांची कामे पूर्ण करा, ज्या गावांतील स्त्रोतांना पाणी नाही, त्या गावांत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे मग्रारोहयोत करा आदी मागण्या केल्या आहेत. या निवेदनावर कोरडे यांच्यासह बी.डी.बांगर, विनोद नाईक, नामदेव राठोड, मारोती काळे, केशव शांकट आदींच्या सह्या आहेत.
स्वच्छतेसाठी जनजागृती
हिंगोली - स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नगर पालिकेने सहभाग घेतला आहे. शहर स्वच्छ अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. नागरिकांचाही यामध्ये सहभाग तेवढाच महत्वाचा असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नागरिकांकडून शहरातील स्वच्छतेबाबत प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे सदर उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.