आरोपींना अटक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:24 PM2018-02-08T23:24:21+5:302018-02-08T23:26:48+5:30

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी उपोषण केले.

 The demand for arrest of the accused | आरोपींना अटक करण्याची मागणी

आरोपींना अटक करण्याची मागणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी उपोषण केले.
आजेगाव येथे १३ जानेवारीच्या मध्यरात्री ध्वज लावल्यावरुन दोन गटांत वाद झाला होता. गावात अशांतता पसरली होती. अनेक निष्पाप व निर्दोष लोकांवर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. तर शिक्षा भोगत असलेल्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तर इतर १५ ते २० जण कारागृहात आहेत. शिवाय गावात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून अनेक लोक गावाच्या बाहेर राहत आहेत. परंतु दुसºया गटातील लोक विविध प्रकारच्या धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना अटक न केल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप केला.
परिणामी, गावात राहणे कठीण झाले असल्याने ग्रामस्थांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर विलास जाधव, लक्ष्मण दळवी, प्रकाश कºहाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
आजही धरणे आंदोलन
४आजेगाव येथील घटनेत सवर्ण समाजाच्या लोकांनी बौद्ध समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तर घटनेत दिवशी हातात काठ्या, दगड, रॉड घेऊन फिरतानाचे त्यांचे चित्रीकरण आहे. तरीही उपोषणास बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे बौद्ध समाजातील लोक ९ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा वसंत चाटसे, मारोती चाटसे आदींनी दिला.

Web Title:  The demand for arrest of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.