हातभट्टीची दारू बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:02+5:302021-04-20T04:31:02+5:30

सवनातांडा येथे तयार होणाऱ्या हातभट्टीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नर्सीतील हातपंप बंद नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील ...

Demand for the closure of the distillery | हातभट्टीची दारू बंद करण्याची मागणी

हातभट्टीची दारू बंद करण्याची मागणी

Next

सवनातांडा येथे तयार होणाऱ्या हातभट्टीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नर्सीतील हातपंप बंद

नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील २४ हातपंपापैकी १४ हातपंप दुरुस्त करण्यात आले आहेत. उर्वरित हातपंप अजूनही बंदच आहेत. आजमितीस नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे. ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन बंद असलेले हातपंप दुरुस्त करावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नर्सी-पहेनी रस्ता खड्डेमय

नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी ते पहेनी हा तीन किलोमीटरचा रस्ता मागील दोन वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. यावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. वाहनचालकांनी तक्रार केल्यानंतर रस्त्याची थातूर-मातूर दुरुस्ती केली जाते. नंतर मात्र ‘जैसे थे’ परिस्थिती होते. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: Demand for the closure of the distillery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.