अवैध धंदे बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:41 AM2018-11-25T00:41:57+5:302018-11-25T00:42:18+5:30
तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील व फाटा येथे सर्रासपणे अवैधरित्या चोरट्या पद्धतीने दारू विक्री होत असून अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना २० नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील व फाटा येथे सर्रासपणे अवैधरित्या चोरट्या पद्धतीने दारू विक्री होत असून अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना २० नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे सर्वसमान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबवून अवैध दारू व जुगार मटका खेळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु छुप्या पद्धतीने जिल्ह्यात सर्रासपणे अवैध धंद्यांना उत येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अवैध धंदे व दारूची चोरटी विक्री बंद करण्याची मागणी हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. डिग्रस व डिग्रसफाटा परिसरात छुप्या पद्धतीने दारूविक्री व जुगार, मटका खेळ सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे येथील परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे ग्रासमस्थांनी केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकाºयांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून येथील परिसरात अवैध धंद्यांना उत आला आहे.