स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:30+5:302021-09-21T04:32:30+5:30
हिंगोली येथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत १०० खाटांचे स्त्री ब बाल रुग्णालयासाठी हिंगोली येथील भूमापन क्रमांक ३७३२ ...
हिंगोली येथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत १०० खाटांचे स्त्री ब बाल रुग्णालयासाठी हिंगोली येथील भूमापन क्रमांक ३७३२ ज्याचे क्षेत्रफळ २९५३ चौ.मी. असून, ही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर बांधकामाकरिता एकूण खर्च ४२.४३ कोटी रुपये खर्च होणार आहे. रुग्णालयाच्या बांधकामाकरिता सन २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाकडून ३.१८ कोटी रुपये व राज्य शासनाकडून ८४.८७ लाख रुपये मंजूर झालेले आहेत. मात्र या रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात नसल्याने येथील रुग्णांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
या बांधकामाची प्रलंबित प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, या रुग्णालयाचे बांधकाम चांगले व दर्जेदार होण्याकरिता मा.सं.वा. गेडाम, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ (प्र.), महाराष्ट्र राज्य यांनी दि. २० जुलै २०२१ रोजी दिलेल्या अटींची पूर्तता करण्याकरिता राज्य ब राष्ट्रीय पातळीवरील कंत्राटदारास कंत्राट देऊन सदर बांधकाम लवकरात लवकर सुरू करून हिंगोलीच्या महिलांना व बालकांना चांगले आरोग्य देण्याची मागणी विराट लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी केली आहे.