आंबा चाेंडी येथील पीक विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:19+5:302021-01-10T04:22:19+5:30

आंबा चाेंडी : वसमत तालुक्यातील आंबा चाेंडी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याने पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून ...

Demand for crop insurance at Mango Chandi | आंबा चाेंडी येथील पीक विमा देण्याची मागणी

आंबा चाेंडी येथील पीक विमा देण्याची मागणी

Next

आंबा चाेंडी : वसमत तालुक्यातील आंबा चाेंडी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याने पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे. खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा भरला हाेता. सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे साेयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला. यानंतर तुटपुंजी रक्कम देत शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसण्यात आली. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी अधीक्षक कार्यालयात आंदाेलन केले. मात्र, आश्वासन देत शेतकऱ्यांना शांंत केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेऊनही पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या पंधरा दिवसात पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास शेतकरी आंदाेलनाच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे तातडीने पीक विमा देण्याची मागणी भानुदास भाेसले, उत्तम भाेसले, माधव अंबेकर, लक्ष्मीकांत अंबेकर, महिपती भाेसले, शे. रशीद यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Demand for crop insurance at Mango Chandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.