अत्याचार करणाऱ्यास फाशी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:04 AM2018-11-28T01:04:07+5:302018-11-28T01:04:23+5:30

शहरातील बावणखोली येथे सात वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अटक असून सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बावणखोली येथील सर्व नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना २७ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे.

 The demand for hanging of the atrocities | अत्याचार करणाऱ्यास फाशी देण्याची मागणी

अत्याचार करणाऱ्यास फाशी देण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील बावणखोली येथे सात वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अटक असून सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बावणखोली येथील सर्व नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना २७ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे.
हिंगोली शहरातील बावणखोली येथील चिमुकलीवर अतिप्रसंगाची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात आरोपी मधुकर निवृत्ती वाठोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. परंतु पोलीस प्रशासनाने सदर घटनेचा गांभीर्याने तपास करण्याची यावेळी मागणी केली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले होते. आरोपीस फाशीची शिक्षा न दिल्यास देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर शेख खलील बेलदार, सत्तार तांबोली, मोहम्मद आतिक, शेख दाऊद, पप्पू जाधव, शे. इमरान लखन यांच्यासह शेकडो जणांच्या स्वाक्षºया आहेत.
मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रासपाचे विनायक भिसे यांनी निवेदन सादर करत आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी केली. तसेच रासपा अल्पसंख्याचे जिल्हाध्यक्ष शाहीखाँ पठाण यांनी निवेदनाद्वारे आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी केली.
कळमनुरी येथे निवेदन
कळमनुरी : सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करणाºया नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कळमनुरी येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना दिलेल्या निवेदनावर इलियास नाईक, सय्यद तोफीक, शेख मतीन, अजीस पठाण, साजीद अतार, असलम रजा, दिन मोहम्मद, शेख असलम आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  The demand for hanging of the atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.