बाजारपेठेची वेळ वाढविण्याची मागणी; ग्रेन मर्चंटचेही बंदचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:34+5:302021-07-10T04:21:34+5:30
सुवर्णकारांच्या निवेदनात म्हटले की, सध्या वेळ कमी दिल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. आपल्याकडे डेल्टा अथवा डेल्टा प्लसचा एकही ...
सुवर्णकारांच्या निवेदनात म्हटले की, सध्या वेळ कमी दिल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. आपल्याकडे डेल्टा अथवा डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही. मात्र गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या बाजारपेठेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी आहे. ती सायंकाळी सहापर्यंत वाढविण्याची मागणी केली. निवेदनावर सुरेशअप्पा सराफ, इंदरचंद सोनी, चंद्रकांत अप्पा सराफ, एम.टी. वर्मा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तर हिंगोली जिल्हा ग्रेन मर्चंट असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन दिले. पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, मुक्त व्यापाराला परवानगी देण्यात यावी, अडते, धान्य उद्योजक यांची मानसिक व आर्थिक स्थिती ढासळली असून व्यापारामध्ये होणारी स्पर्धा संपुष्टात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. सरकारी यंत्रणावर याचा फार मोठा ताण पडणार आहे. तसेच सरकारी तिजोरीवरही बोजा पडणार आहे. स्टॉक प्रतिबंधक कायदा अधिसूचना त्वरित परत घेऊन मुक्त व्यापाराची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी आ. गजानन घुगे यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.