आयकर कार्यालय बंद न करण्याची अर्थ राज्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:48+5:302021-08-20T04:33:48+5:30
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त कराड हिंगोलीत आले होते. यावेळी आयकर कार्यालय बंद करू नये, अशी मागणी केली. हे कार्यालय बंद करण्याची ...
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त कराड हिंगोलीत आले होते. यावेळी आयकर कार्यालय बंद करू नये, अशी मागणी केली. हे कार्यालय बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना परभणीला ये जा करावी लागते. शिवाय आयकर विवरणपत्रे भरण्यासाठी या विभागाची वेबसाईटच मागील काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आता विवरणपत्रे दाखल करण्यास मुदतवाढीची मागणीही केली. सध्या ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. एवढ्या कमी वेळात अनेकांची कामे करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांना दंडाचा फटका बसू शकतो. जीएसटी कायद्यांतर्गत सेट ऑफ दुरुस्तीचे विवरण सप्टेंबर महिन्यात देणे बंधनकारक आहे. नंतर ते करता येत नाही. त्याची तारीख मार्च २०२२ करावी, अशी मागणीही केली. विवरणपत्रात दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. कोरोनामुळे काहींना वेळेत जीएसटी विवरणपत्रके दाखल करता आली नाही. त्यांचा जीएसटी क्रमांक रद्द केला आहे. तो पुन्हा चालू करण्यास मोठा त्रास होत आहे. ही सुविधा स्वयंचलित करण्याची मागणीही केली. यावेळी संघटनेचे संदीप पतंगे, महेश बियाणी, नीलेश तापडिया, दिलीप झंवर, केशव पतंगे, राजेश सोमाणी, अमीर कुंदा, पंकज जोशी, सुनील झंवर आदी उपस्थित होते.