आरोग्याच्या २९६ पदांना पंचायत राज सेवार्थ प्रणालीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:14+5:302021-05-15T04:28:14+5:30
हिंगोली जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील २९६ पदांना तात्काळ पंचायतराज सेवार्थ प्रणालीमध्ये समावेशित करण्यात यावे, अशी मागणी खा. पाटील ...
हिंगोली जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील २९६ पदांना तात्काळ पंचायतराज सेवार्थ प्रणालीमध्ये समावेशित करण्यात यावे, अशी मागणी खा. पाटील यांनी टोपे यांच्याकडे केली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हा परिषदअंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) ५४, आरोग्य सेवक (महिला) ६९, अर्धवेळ स्त्री परिचर १३९, औषध निर्माण अधिकारी ०१, आरोग्य सहाय्यिका ०१, कनिष्ठ सहाय्यक ०१, वाहनचालक ०१, परिचर ०४ आणि सफाई कामगारांची २५ अशी एकूण २९६ पदे या प्रणालीअंतर्गत समावेशित करावयाची आहेत. सद्यस्थितीमध्ये आरोग्य सेवक पुरुष पदांमधून ५४ पैकी केवळ १० पदे आणि स्त्री परिचर संवर्गातील १३९ पैकी ७९ पदे भरण्यात आली असून, त्यांना ऑफलाईन पद्धतीने वेतन अदा करण्यात येत आहे. प्रणालीमध्ये या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर त्यांना शासकीय नियमानुसार सेवाशर्ती लागू होतील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोविड सेंटरना भेट देऊन सोयी-सुविधांची पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान त्यांना बऱ्याच ठिकाणी सुविधांचा अभाव आढळून आला. ज्या ठिकाणी सुविधा नसतील किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्या ठिकाणी तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते.