समगा पुलाच्या दुरुस्तीसाठी ५ काेटी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:25 AM2021-01-02T04:25:25+5:302021-01-02T04:25:25+5:30
हिंगोली : हिंगाेली तालुक्यातील समगा मार्गावरील कयाधू नदी पुलाच्या दुरुस्तीसाठी नाबार्ड योजनेतून ५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी ...
हिंगोली : हिंगाेली तालुक्यातील समगा मार्गावरील कयाधू नदी पुलाच्या दुरुस्तीसाठी नाबार्ड योजनेतून ५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आ. संतोष बांगर यांनी शासनाकडे केली आहे. पुढील काही दिवसांतच या कामासाठी निधी मिळाल्यास या मार्गावरील सुमारे ९ ते १० गावांचा वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.
हिंगोली ते समगा मार्गावर कयाधू नदीवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. त्यामुळे समगा, दुर्गधामणी, खेड, येडूद, कंजारा यासह परिसरातील ९ ते १० गावांचा संपर्क तुटतो. या मार्गावरून येेणाऱ्या गावकऱ्यांना खानापूर किंवा पिंपळदरी मार्गाने हिंगोलीत यावे लागते. तर समगा व जवळच्या गावांना रेल्वे पुलावरून यावे लागत आहे. ही वाहतूक धोकादायक आहे. तीन वर्षांपूर्वी पावसामुळे पुलाचा काही भाग खचला आहे. त्यामुळे अनेकांची मोठी अडचण होत आहे. या पुलाची दुरुस्ती करून उंची वाढविणे आवश्यक असून त्यासाठी शासनाने नाबार्ड योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. बांगर यांनी केली आहे. फाेटाे नं. ०९