वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:26+5:302021-02-05T07:51:26+5:30
मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे ...
मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक
कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे लोखंडी रॉडही निघून गेले आहेत. या भागातील नागिरक व वाहनचालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही नाल्याची दुरुस्ती केली नाही. मुख्य मार्गाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन नाल्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कळमनुरी तालुक्यात अवैध वाहतूक वाढली
कळमनुरी: तालुक्यातील आ. बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा, बोल्डा, सिंदगी, वाकोडी, मसोड, सालेगाव आदी मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
नालीचे पाणी रस्त्यावर
वाहनचालक त्रस्त
औंढा नागनाथ: शहरातील प्रभाग १६ मधील सोनार गल्ली येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बांधल्या आहेत. परंतु, पाण्याचा मार्ग बरोबर काढला गेला नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या नागिरका तसेच वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घाण पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी
औंढा नागनाथ: शहरातील बसस्थानक परिसरातील हॉटेल, पानटपऱ्या, दुकानांसमोर ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्त्यावरुन ये-जा करण्यास अवघड होऊन बसत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
शिरडशहापूर येथे दिवसाही दिवसे सुरु
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जामा मस्जिद, झोपडपट्टी परिसरात दिवसाही दिवे सुरु आहेत. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरु असलेले दिवे बंद करुन ज्या भागात दिवे नाहीत तेथे दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘नव्याने गतिरोधक बसवावे’
हिंगोली: कयाधू नदी पुलाजवळील गतिरोधक हे उंच झाले असल्यामुळे बहुतांश वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवित आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने बसवावे, अशी मागणी होत आहे.