गुन्हा मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:05 AM2018-06-22T01:05:08+5:302018-06-22T01:05:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे महावितरणच्या कार्यालयात डीपीसाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व इतरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले की, शिवसेनेचे शिष्टमंडळ अधीक्षक अभियंता जाधव यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. तसेच कार्यकर्त्याच्या दिशेने घंटी भिरकावली. तसेच त्यांनीच गुन्हाही दाखल केला. तो रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर बी.डी. चव्हाण, उद्धवराव गायकवाड, दिलीप घुगे, बाळासाहेब मगर, नंदू खिल्लारे, रामेश्वर शिंदे, शिवाजी कºहाळे, डी.वाय. घुगे, आनंदराव जगताप, भानुदास जाधव, गणाजी बेले आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, औंढा नागनाथ येथे जि.प. गटनेते अंकुशराव आहेर यांच्या नेतृत्वात श्रीशैल्य स्वामी, परिहार, मुसळे आदींनी तहसीलला निवेदन दिले.